function downloadVideo() { const videoUrl = document.getElementById('videoUrl').value; // Implement logic to download the video (e.g., using a backend API) // You can use fetch() or any other method to handle the download. // Replace this placeholder with your actual download logic. console.log(`Downloading video from ${videoUrl}`); } घाटातील बोगद्यांची तपासणी - Gaatatil Bogdyanchi Tapasni

घाटातील बोगद्यांची तपासणी - Gaatatil Bogdyanchi Tapasni

घाटातील बोगद्यांची तपासणी
म. टा. प्रतिनिधी, मुंबई: मुंबई-पुणे आणि मार्गावर पावसाळ्यात दरडी कोसळण्याची भीती असते. घाटमाथ्यावरील लहान-मोठे दगड पावसाच्या पाण्यासह रुळांवर पडतात आणि संपूर्ण ठप्प होते. यावर उपाय म्हणून दोन्ही मार्गांवरील एकूण ७० बोगद्यांच्या तपासणीचे काम रेल्वे प्रशासनाने हाती घेतले आहे. कर्जत ते लोणावळा दरम्यान दक्षिण पूर्व घाट विभागात पावसाळ्याच्या तयारीचा एक भाग म्हणून ५२ बोगद्यांची तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

कर्जत ते लोणावळा दरम्यान असलेला बोगदा क्रमांक ४१ आणि ३८ तसेच दक्षिण पूर्व घाट विभागातील २९ बोगद्यांचे काम सुरू आहे. पावसाळ्यात रेल्वे वाहतुकीत कोणताही अडथळा येऊ नये म्हणून देखरेखीसाठी ७४ कर्मचाऱ्यांची २४ तास नियुक्ती करण्यात येणार आहे. उत्तर पूर्व घाट विभाग म्हणजेच कसारा ते इगतपुरी दरम्यान १८ बोगद्यांची तपासणी सुरू आहे. स्कॅनिंग पूर्ण झाल्यानंतर पावसात कोसळण्याची शक्यता असलेले दगड पाडले जातील. पावसात वाहतुकीत कोणताही अडथळा येऊ नये म्हणून १४ ठिकाणी ५० वॉचमन तैनात करण्यात येणार असून, १२ बीटवर १०० पेट्रोलिंग कर्मचारी तैनात केले जातील. 

कसारा आणि इगतपुरी येथे तीन जुन्या पुलांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. करोना काळात मजूर मूळ गावी गेल्याने मान्सूनपूर्व कामांचा वेग मंदावला आहे. मजुरांच्या अनुपलब्धतेमुळे एकाचवेळी अनेक ठिकाणांवरून मजुरांना एकत्र करून कामे पूर्ण करावी लागत आहे. मुंबई महापालिकेकडून चर्चगेट-दहिसरदरम्यान ४१ कल्व्हर्टची सफाई सुरू आहे. मिरा-भाईंदर महापालिकेकडून दहिसर-वसई रोडदरम्यान तीन, वसई-विरार महापालिकेकडून वसई रोड-विरारदरम्यान ११ कामे सुरू आहेत. ही ३० एप्रिलपर्यंतची आकडेवारी आहे. 

स्वयंचलित पर्जन्यमापक दादर-परळ या सखल भागात पाणी साचण्याची योग्य वेळेत माहिती मिळवता यावी, यासाठी या परिसरात आठ फ्लडगेज बसविण्यात येत आहेत. पश्चिम रेल्वेवरील उपनगरीय स्थानकात एकूण ३६ गेजची व्यवस्था करण्यात आली आहे. पश्चिम रेल्वेवर भारतीय हवामान विभागाच्या समन्वयाने सहा ठिकाणी स्वयंचलित पर्जन्यमापक उभारण्यात आले आहेत. यामुळे रिअल टाइम माहिती मिळण्यास मदत होईल. या व्यतिरिक्त अन्य १० ठिकाणी पश्चिम रेल्वेने तयार केलेले रेनगेज उभारण्यात आले आहेत.

Post a Comment

0 Comments