function downloadVideo() { const videoUrl = document.getElementById('videoUrl').value; // Implement logic to download the video (e.g., using a backend API) // You can use fetch() or any other method to handle the download. // Replace this placeholder with your actual download logic. console.log(`Downloading video from ${videoUrl}`); } लसीकरणासाठी केरळ पॅटर्न वापरावा - Lasikaranasati Keral Pattern Vaparava

लसीकरणासाठी केरळ पॅटर्न वापरावा - Lasikaranasati Keral Pattern Vaparava

लसीकरणासाठी केरळ पॅटर्न वापरावा - Lasikaranasati Keral Pattern Vaparava
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई राज्यात लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबवण्यासाठी केरळ पॅटर्नचा अवलंब करा, अशी मागणी माजी आरोग्यमंत्री आणि शिवसेना नेते यांनी केली आहे. त्यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री यांना पत्रही पाठवले आहे. केंद्र सरकारकडून केरळला ७३ लाख २६ हजार ८०६ लस प्राप्त झाल्या. मात्र, त्यामधून ७४ लाख २६ हजार १६४ लोकांना लस देण्यात आली. 



त्यामुळे ८८ हजार जास्त लोकांना लस देण्यात केरळ सरकारला यश मिळाले आहे. लशीची थोडीही मात्रा फुकट जाऊ न दिल्यामुळे केरळला ही गोष्ट साध्य झाल्याचे दीपक सावंत यांनी पत्रात म्हटले आहे. त्यासाठी लसीकरण केंद्रांवर योग्य नियोजन करण्यात आले. लशीच्या एका कुपीतून १० लोकांना लस देता येते. त्यामुळे तेवढे लोक असल्याशिवाय संबंधित केंद्रावर लसीकरणाला सुरुवात केली जात नसे. 


त्यासाठी ऑटो डिसपोझेबल सिरिंज वापरण्यात आल्याचे सावंत यांनी म्हटले आहे. असाच प्रोटोकॉल राज्य सरकारने आपल्याकडे तयार करून त्याची कठोर अंमलबजावणी करावी. त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकार यांच्यात लसीकरण पुरवठ्याबाबत होणाऱ्या वादावर तोडगा निघू शकतो, असा विश्वास दीपक सावंत यांनी व्यक्त केला आहे.

Post a Comment

0 Comments