function downloadVideo() { const videoUrl = document.getElementById('videoUrl').value; // Implement logic to download the video (e.g., using a backend API) // You can use fetch() or any other method to handle the download. // Replace this placeholder with your actual download logic. console.log(`Downloading video from ${videoUrl}`); } बेस्टचे सव्वा कोटींचे नुकसान

बेस्टचे सव्वा कोटींचे नुकसान

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईः मुंबईत सोमवारी चक्रीवादळाने थैमान घातल्याने बेस्ट उपक्रमाचे सुमारे सव्वा कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. जोरदार पाऊस, वाऱ्याने विविध ठिकाणी बसस्टॉप, बसचौक्या, संरक्षक भिंती कोसळल्याने सुमारे एक कोटी २५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. समुद्रकिनाऱ्याजवळ असलेल्या कुलाबा, गेट वे ऑफ इंडिया, मरिन लाइन्स, गिरगाव चौपाटी, दादर, माहीम आदी भागांतही विजेच्या खांबांचे मोठे नुकसान झाले. त्यात सुमारे ५४ विजेच्या खांबांना वादळाने हानी पोहोचवली असून त्यात सुमारे ४५ लाखांचे नुकसान झाले. तसेच काही ठिकाणी बेस्टच्या सरंक्षक भिंतींवर झाडे कोसळल्यानेही नुकसान झाले. सोमवारी दिवसभरात झाडे कोसळल्याने बेस्टच्या दोन बसचेही नुकसान झाले. तसेच, काही स्टोपकडील छत उडून गेल्याने बेस्टचे सुमारे ३० लाखांचे नुकसान झाले. प्रवासी संख्येत घट चक्रीवादळाच्या इशाऱ्याने मुंबईकरांनी घरी थांबणे पसंद केले. त्यामुळे बेस्ट प्रवासी संख्येतही मोठी घट झाली. सोमवारी बेस्टने तीन हजार ३३२ बस चालवल्या. पण अनेक मार्गावर कमी प्रवासी असल्याने दैनंदिन महसुलात घट नोंदवली गेली. त्यातून बेस्टला ५० लाख इतके नुकसान सहन करावे लागले.

Post a Comment

0 Comments