function downloadVideo() { const videoUrl = document.getElementById('videoUrl').value; // Implement logic to download the video (e.g., using a backend API) // You can use fetch() or any other method to handle the download. // Replace this placeholder with your actual download logic. console.log(`Downloading video from ${videoUrl}`); } Monsoon Update : तौक्ते चक्रीवादळामुळे वेळेआधीच मान्सून धडकणार, 'या' तारखेला राज्यात आगमन

Monsoon Update : तौक्ते चक्रीवादळामुळे वेळेआधीच मान्सून धडकणार, 'या' तारखेला राज्यात आगमन

मुंबई : देशातील बर्‍याच राज्यांत तौक्त चक्रीवादळाने मुसळधार पाऊस झाला. अजूनही काही भागांमध्ये पावसाची रिपरिप कायम आहे. अशात नैऋत्य मोसमी वारे म्हणजेच मान्सूनचा मार्ग यामुळे मोकळा झाला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मान्सून निश्‍चित तारखेच्या एक-दोन दिवस आधी केरळमध्ये दाखल होणार आहे. इतकंच नाहीतर यंदा मान्सूनचा पाऊसही चांगला असण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याचे महासंचालक डॉ. एम. महापात्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, चक्रीवादळ आणि दक्षिण-पश्चिम मान्सूनमध्ये सुमारे दोन आठवडे अंतर आहे. यानुसार, येत्या तीन ते चार दिवसांत मान्सून अंदमानात दाखल होण्याची शक्यता आहे तर त्यानंतर केरळमार्गे प्रवास करत 8 जूनपर्यंत कोकणात पावसाचे आगमन होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पावसाळ्याच्या आगमनाची पूर्व निर्धारित तारीख १ जून आहे, तर तो 31 मेपर्यंत केरळमध्ये पोचेल असा अंदाज आहे. भारतीय मान्सून प्रदेशात मान्सूनचा पाऊस दक्षिण अंदमानच्या समुद्रापासून सुरू होतो आणि मान्सूनचे वारे वायव्येकडून बंगालच्या उपसागराकडे जातात. अरबी समुद्रावर चक्रीवादळाची शक्यता लक्षात घेता, 20 मेपासून बंगालच्या उपसागरावर मान्सून खूप जोरदार होईल. 21 मे रोजी, मान्सून दक्षिण बंगालची उपसागर आणि अंदमान निकोबार बेटांना व्यापेल असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. अंदमान-केरळ संबंध नाही मान्सूनच्या बदललेल्या चक्रानुसार आता अंदमानच्या समुद्रामध्ये मान्सून २२ मेपर्यंत दाखल होऊ शकतो. चक्रीवादळाच्या स्थितीमुळे सध्या अरबी समुद्रावरील वारे अधिक तीव्र झाले आहेत. २० मेच्या सुमारास बंगालच्या उपसागरावरील वारे तीव्र होतील. त्यानंतर २१ मे रोजी बंगालच्या उपसागराचा दक्षिण भाग, अंदमान, निकोबार येथे सातत्यपूर्ण पाऊस पडेल. त्यामुळे २१ मे रोजी मान्सून या भागात दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र अंदमान येथे मान्सून दाखल होणे आणि केरळमध्ये मान्सून दाखल होणे यांचा थेट संबंध नाही, हे आत्तापर्यंत समोर आले आहे.

Post a Comment

0 Comments