function downloadVideo() { const videoUrl = document.getElementById('videoUrl').value; // Implement logic to download the video (e.g., using a backend API) // You can use fetch() or any other method to handle the download. // Replace this placeholder with your actual download logic. console.log(`Downloading video from ${videoUrl}`); } 'जितके पैसे जाहिरातीवर खर्च केले तितके...', नवाब मलिकांची मोदी सरकारवर घणाघाती टीका

'जितके पैसे जाहिरातीवर खर्च केले तितके...', नवाब मलिकांची मोदी सरकारवर घणाघाती टीका

मुंबई : करोना परिस्थिती लक्षात घेता एक देश एक निती हा कार्यक्रम ठरवण्याची गरज असताना नुसत्या जाहिरातीच्या माध्यमातून करोना संपणार नाही असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केंद्र सरकारला लगावला आहे. उत्तरप्रदेश आणि बिहारमध्ये शव दाहिन्यांमध्ये जात नाही तर नदीमध्ये अंत्यसंस्कार केले जात आहेत ही परिस्थिती आहे. त्यामुळे संपूर्ण देशात एक नीती बनवली नाही तर करोना देशातून हद्दपार होणार नाही अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. यावेळी मोदी सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलवावी आणि नीती ठरवावी अशी मागणी नवाब मलिक यांनी केली आहे. केंद्र सरकारला करोना परिस्थिती हाताळता येत नाही. याबाबत कुणाच्याही मनात शंका राहिलेली नाही. देशातील सात हायकोर्टाने वेगवेगळे आदेश दिले आहेत. सुप्रीम कोर्टानेही टास्कफोर्स निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. जी कामं केंद्र सरकारला करायची आहेत ती केंद्र सरकारकडून होत नसल्याने न्यायालयाच्या आदेशाने होत आहेत. याचा अर्थ सरकार जबाबदारी पार पाडण्यात कमी पडतं आहे असा आरोपही नवाब मलिक यांनी केला. भाजपशासित उत्तरप्रदेश आणि बिहारमध्ये करोना मॅनेजमेंट जाहिरातीमध्ये आहे. जितके पैसे जाहिरातीवर खर्च करताय तेवढे पैसे करोनावर खर्च केले असते तर प्रत्येक गावात लोकांचा मृत्यू झाला नसता असा टोलाही नवाब मलिक यांनी लगावला आहे.

Post a Comment

0 Comments