
म. टा. प्रतिनिधी : लिमिटेड या कंपनीचा मसहूल कमी होऊनही नफ्यात मात्र घसघशीत वाढ झाली आहे. मुंबईला वीजपुरवठा करणारी (एईएमएल) ही अदानी ट्रान्समिशन लिमिटेडचीच उपकंपनी आहे. अदानी ट्रान्समिशनने जानेवारी-मार्च २०२० दरम्यान ३३१७.५१ कोटी रुपये महसूल मिळवला होता. हाच महसूल मार्च २०२१ अखेर २८७५.६० कोटी रुपयांपर्यंत घसरला.
तसे असतानादेखील नफा मात्र ५८.९७ कोटी रुपयांवरुन २५६.५५ कोटी रुपयांवर गेला. यामुळे कंपनीच्या २०२०-२१ या आर्थिक वर्षाच्या नफ्यातदेखील तब्बल ८२ टक्के वाढ झाली. कंपनीने मार्च २०२१ अखेर १२८९.५७ कोटी रुपयांचा नफा कमवला. हाच नफा मार्च २०२० (२०१९-२०) अखेर फक्त ७०९.४६ कोटी रुपये होता. याचदरम्यान कंपनीचा २०१९-२० मधील महसूल ११ हजार ६८१.२९ कोटी रुपये होता.
हा महसूल मार्च २०२१ अखेर (२०२०-२१) १० हजार ४५८.९३ कोटी रुपयांवर आला. मागील वर्षी लॉकडाऊनमुळे उद्योगधंदे व व्यवसाय सुमारे चार ते सहा महिने बंद होते. त्यामुळे वीजेच्या मागणीत घट झाली होती. यामुळेच वीज कंपन्यांच्या महसुलात घट झाल्याचे चित्र आहे. अदानी ट्रान्समिशनच्या महसुलात घट झाल्यानंतरही नफ्यात मात्र वाढ झाली आहे, हे विशेष.
0 Comments