मुंबई: देशातील करोनाची स्थिती, लशीचा तुटवडा, रुग्णालयांमधील बेडची कमतरता आणि मृत्यूचे वाढते प्रमाण यावरून केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका होऊ लागली आहे. विरोधी पक्ष केंद्र सरकार आणि यांच्यावर हल्लाबोल करत आहेत. केवळ देशातच नाही, तर देशाबाहेर देखील भारतातील स्थितीचे मूल्यमापन केले जात आहे. अमेरिकेतील द कॉन्व्हरसेशन या वेबसाइटने देखील मोदींच्या कामगिरी वाईट असल्याचे म्हटले आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. ( over in country) अमेरिकेतील '' या वेबसाइटने ट्विटरच्या माध्यमातून जनमत चाचणी घेतली. जगभरात करोनाच्या काळात वाईट कामगिरी करणारे नेते कोण, यावर ही चाचणी घेण्यात आली. या चाचणीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाईट कामगिरीसाठी ९० टक्के मते मिळाली. मोदींना एकूण ७५ हजार ४५० मते मिळाली. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पंतप्रधान मोदी यांना टीकेचे लक्ष्य केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ट्विट करत म्हटले आहे की, 'अमेरिकेतील 'द कॉन्व्हर्सेशन' वेबसाइटने ट्विटरवर जनमत चाचणी घेतली. कोरोना काळात सर्वांत सुमार कामगिरी करणारे नेते कोण, यावर चाचणी झाली. या चाचणीत मोदींचं नाणं खणखणीत वाजलं. सर्वांत वाईट कामगिरीसाठी त्यांना एकूण (७५,४५०) ९० टक्के मतं मिळाली.' क्लिक करा आणि वाचा- इतक्यावरच न थांबता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 'द डेली गार्डियन' या वृत्तपत्राच्या हवाल्याने भाजपने केलेल्या मोदींच्या स्तुतीवरही टीकास्त्र सोडले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या आणखी एका ट्विटमध्ये म्हणतो, 'काही दिवसांपूर्वी 'द डेली गार्डियन' या लोकल वृत्तपत्राला ग्लोबल भासवून मोदी कसे चांगले काम करतात, हे दाखवायचा प्रयत्न भाजपने केला. त्या तुलनेत 'द कॉन्व्हर्सेशन' हे वृत्तपत्र मोठं आहे. त्यामुळे दखल घेणं क्रमप्राप्त ठरतं. या चाचणीत अव्वल आलेल्यांना शुभेच्छा!' क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
0 Comments