function downloadVideo() { const videoUrl = document.getElementById('videoUrl').value; // Implement logic to download the video (e.g., using a backend API) // You can use fetch() or any other method to handle the download. // Replace this placeholder with your actual download logic. console.log(`Downloading video from ${videoUrl}`); } मुंबई हाय: नौदलाला सापडलेल्या मृतदेहांचा आकडा ७० वर, १८६ बचावले

मुंबई हाय: नौदलाला सापडलेल्या मृतदेहांचा आकडा ७० वर, १८६ बचावले

मुंबईः तौक्ते चक्रीवादळामुळे 'मुंबई हाय' जवळील दुर्घटनेत आज रविवारपर्यंत एकूण ७० मृतदेह हाती आल्याचे स्पष्ट झाले आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत १८६ जणांचे प्राण वाचविण्यात नौदलासह अन्य बचावनौकांना यश आले आहे. शोधमोहीमेत आतापर्यंत २५६ कर्मचाऱ्यांचा थांगपत्ता लागला आहे. या ७० मृतदेहांमध्ये रायगडात सापडलेल्या कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आलेला नाही. रायगडात सापडलेले मृतदेह नेमके या घटनेतील की वराप्रदा या टग अपघातातील हे अद्याप अस्पष्ट असल्याचे वृत्त आहे. (barge p 305 accident 70 dead bodies were found till today) तौक्ते चक्रीवादळामुळे 'ओएनजीसी'च्या हीरा इंधन विहीर परिसरात कार्यरत असलेली 'पी-३०५' ही बार्ज समुद्रात बुडाली. या अपघातात आत्तापर्यंत एकूण ७० जणांचा मृत्यू झाला आहे. तर, अजूनही काहीजण बेपत्ता असून त्यांचा शोध मोहीमेअंतर्गत शोध घेणे सुरु आहे. 'मुंबई हाय'मधील 'पी-३०५' या बार्ज (समुद्रातील निवासी तरंगता फलाट) दुर्घटनेचे शोधकार्य आता दमण-दिवपर्यंत पोहोचले आहे. बेपत्ता झालेल्या कर्मचाऱ्यांचा शोध घेण्यासाठी नौदलाच्या चार युद्धनौका, तटरक्षक दलाच्या सहा नौका तसेच अन्य कंपन्यांची दोन जहाजे सतत प्रयत्नशील आहेत. त्याखेरीज नौदलाने सी किंग हेलिकॉप्टर व 'पी-८आय' हे टेहळणी करणारे विमान आणि तटरक्षक दलाचे चेतक हेलिकॉप्टर देखील या शोधमोहीमेत सक्रिय झाले आहे. क्लिक करा आणि वाचा- या दुर्घटनेप्रकरणी बार्जवरील मुख्य अभियंता मुस्तफिर रेहमान हुसेन शेख यांचा जबाब घेण्यात आला. त्यावरून कर्मचाऱ्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा ठपका ठेवत यांच्यासह अन्य काही जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. चक्रीवादळाची सूचना देऊन देखील कॅप्टन राकेश बल्लव यांनी कोणतीही कारवाई केली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांनी कर्मचाऱ्यांचे म्हणणे देखील ऐकले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानुसार पोलिसांनी बल्लव यांच्यावर काही जखमी, दुखापत झालेल्या व बुडालेल्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Post a Comment

0 Comments