function downloadVideo() { const videoUrl = document.getElementById('videoUrl').value; // Implement logic to download the video (e.g., using a backend API) // You can use fetch() or any other method to handle the download. // Replace this placeholder with your actual download logic. console.log(`Downloading video from ${videoUrl}`); } Gold Price Today : सलग तिसऱ्यांदा सोनं झालं स्वस्त, वाचा आजचे नवे दर

Gold Price Today : सलग तिसऱ्यांदा सोनं झालं स्वस्त, वाचा आजचे नवे दर

मुंबई : सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. कारण सलग तिसऱ्यांदाच आजही सोन्याच्या किंमती (Gold Price) घसरल्याचं समोर आलं आहे. शुक्रवारी एमसीएक्सवरील (MCX) सोन्याच्या किंमतीत चार दिवसांत तिसऱ्यांदा घसरणी झाल्याची नोंद करण्यात आली आहे. इतकंच नाहीतर १० ग्रॅम सोन्याचा वायदा भाव () ०.४ टक्क्यांनी खाली घसरून ४८३५८ डॉलरवर पोहोचला आहे. आज चांदीचा वायदा भाव 0.8 टक्क्यांवरून घसरून ७१७४८ रुपये प्रति किलोवर आला आहे. खरंतर, या आठवड्यामध्ये क्रिप्टोकरन्सीमध्ये (Cryptocurrency) अस्थिरता आल्यामुळे सोन्याच्या दरांमध्ये घसरण होत असल्याची माहिती तज्ज्ञांकडून देण्यात आली आहे. यासोबतच अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेतील सुधारणांमुळेही आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याच्या भावांमध्ये घसरण होत आहे. जाणून घ्या तुमच्या शहरातील सोन्याच्या किंमती - आजा राजधानी दिल्लीत २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ३५० रुपयांनी वाढून ४५,००० रुपयांवर पोहोचली आहे. तर २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४७,००० रुपयांच्या पातळीवर आहे. - देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत २२ कॅरेट सोन्याची किंमत ४६,००० रुपये प्रति १० ग्रॅम आणि २४ कॅरेट सोन्याची किंमत ५०,१६० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. - पुण्यामध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत १० ग्रॅम ४६,००० रुपये तर २४ कॅरेट सोन्याची किंमत १० ग्रॅम ४७,००० रुपये आहे. - नागपुरामध्ये २२ कॅरेट सोन्यासाठी ४६,००० रुपये १० ग्रॅम प्रति तर २४ कॅरेट सोन्यासाठी ४७,००० रुपये १० ग्रॅम मोजावे लागणार आहेत. - चेन्नईत २२ कॅरेट सोन्याची किंमत ४५,९८० रुपये १० ग्रॅम आहे आणि २४ कॅरेट सोन्याची किंमत ५०,१६० रुपये १० ग्रॅम आहे. - लखनऊमध्ये २२ कॅरेट १० ग्रॅम सोन्याची किंमत ४६,९३० रुपये आहे आणि २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याची किंमत ५०,८३० रुपयांवर पोहोचली आहे. सोन्यामध्ये गुंतवणुकीची सुवर्णसंधी करोनाच्या संकटामध्ये सध्या अनेकजण सोन्यामध्ये गुंतवणूक करत आहेत. सोन्यात गुंतवणूक करणं हे सध्या सुरक्षित मानलं जातं. कोरोना विषाणूत सोन्याच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. येत्या काही महिन्यांत करोनाची तिसरी लाटही येईल. तज्ञांचा असा विश्वास आहे की, येत्या काळात सोने 50 हजारांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोन्यामध्ये गुंतवणूकीसाठी हीच योग्य वेळ आहे.

Post a Comment

0 Comments