function downloadVideo() { const videoUrl = document.getElementById('videoUrl').value; // Implement logic to download the video (e.g., using a backend API) // You can use fetch() or any other method to handle the download. // Replace this placeholder with your actual download logic. console.log(`Downloading video from ${videoUrl}`); } Devendra Fadnavis: ये पब्लिक है, सब जानती है!; फडणवीसांचं आता सोनिया गांधींना पत्र

Devendra Fadnavis: ये पब्लिक है, सब जानती है!; फडणवीसांचं आता सोनिया गांधींना पत्र

मुंबई: अध्यक्षा यांनी अलिकडच्या काळात पंतप्रधान यांना पाठविलेली पत्रे आणि विविध काँग्रेस नेत्यांच्या वक्तव्यांच्या अनुषंगाने राज्याचे विरोधी पक्षनेते यांनी सोनिया गांधी यांना एक पाठवले असून त्यात 'ये पब्लिक है, सब जानती है' म्हणत या संकटात केवळ राजकारण न करता काँग्रेस पक्षाने एका रचनात्मक विरोधी पक्षाची भूमिका वठवण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. ( ) वाचा: सोनिया गांधी यांना पाठविलेल्या पत्रात देवेंद्र फडणवीस यांनी बाबत अनेक मुद्द्यांवर बोट ठेवले आहे. '१३ मे पर्यंतच्या आकडेवारीचा विचार केला तरी देशातील एकूण करोना रुग्णांमध्ये महाराष्ट्रातील रुग्णांचे प्रमाण हे २२ टक्के आहे, जे सातत्याने ३० टक्के आणि त्याहून अधिक राहिले आहे. देशात झालेल्या एकूण मृत्यूंमध्ये महाराष्ट्राचे प्रमाण ३१ टक्के, तर सक्रिय रुग्णांचे प्रमाण सुद्धा १४ टक्के आहे. त्यामुळे देशातील करोनाच्या स्थितीचा विचार करताना महाराष्ट्राची स्थिती दुर्लक्षित करता येणार नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील स्थिती सुधारली, तर केंद्र सरकारच्या संसाधनांवरील ताण कमी होईल आणि देशातील करोनाचा लढा अधिक ताकदीने लढता येईल, याच्याशी आपण सहमत असालच. आज महाराष्ट्राला सर्वाधिक मदत दिली जाते आहे, ज्यात १.८० कोटी व्हॅक्सिन्स, ८ लाखांहून अधिक रेमडेसिवीर, १७५० मेट्रिक टन ऑक्सिजन, कितीतरी वेंटिलेटर्स, बायपॅप आणि ऑक्सिजन काँन्स्ट्रेटर्सचा समावेश आहे. असे असले तरी काही लोकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणे, हे त्यांच्या राजकारणाचे अंतिम लक्ष्य वाटते', असे फडणवीस यांनी पत्रात नमूद केले आहे. वाचा: राज्यातील सरकारला आणि काही माध्यमांना मुंबई म्हणजेच महाराष्ट्र असे वाटते. आता समजा मुंबईची स्थिती पाहिली तरी येथे चाचण्या कमी, त्यातही रॅपिड अँटीजेन चाचण्यांचे प्रमाण अधिक ठेऊन एक नवीन मॉडेल तयार करण्यात आले. करोनामुळे होणारे मृत्यू सुद्धा मोठ्या प्रमाणात लपविले जात आहेत. अन्य कारणांमुळे झालेले मृत्यू या वर्गवारीचे राज्यातील अन्य जिल्ह्यांचे प्रमाण ०.८ टक्के असताना एकट्या मुंबईत ते ४० टक्के आहे. मुंबईत दरवर्षी सरासरी ८८ हजार मृत्यू होतात. पण, २०२० या वर्षांत यात २०,७१९ मृत्यू वाढले. यातील ११,११६ मृत्यू केवळ करोनाचे दाखविले. म्हणजे प्रत्यक्षात ९,६०३ करोना मृत्यू दडविले. गेल्यावर्षीचा हा क्रम याही वर्षी सुरूच आहे. आता यालाच महाराष्ट्र मॉडेल म्हणायचे का आणि ते देशाने स्वीकारायचे का? आजही अंत्यसंस्कारांसाठी वेटिंग पिरिएड आहे. देशात दररोज ४ हजार मृत्यू करोनामुळे नोंदले जात असताना त्यातील ८५० मृत्यू हे महाराष्ट्रातील आहेत आणि सरकार आपले कौतुक करण्यात व्यस्त आहे. मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र यासारख्या भागांकडे सरकारचे पूर्ण दुर्लक्ष आहे. त्यांना देवाच्या आधारावर सोडून देण्यात आले आहे. ग्रामीण भागात बेड्स नाही, उपचार नाही, रेमडेसिवीर आणि ऑक्सिजनसाठी संघर्ष आहे. शेवटी विविध न्यायालयांना हस्तक्षेप करीत आदेश द्यावे लागले आहेत. ग्रामीण महाराष्ट्रात करोना संसर्ग आणि मृत्यूची स्थिती अतिशय वाईट आहे. रेमडेसिवीरच्या काळाबाजारीत सरकारी डॉक्टर पकडले जातात, तर त्यांचा पीसीआर सुद्धा मागितला जात नाही, अशी स्थिती आहे, असे सांगताना अमरावतीतील प्रकार देवेंद्र फडणवीस यांनी निदर्शनास आणून दिला आहे. वाचा: कधीकधी लॉकडाऊन हा उपाय असतो, पण असे करताना गरीब, उपेक्षित, शेतकरी यांना पॅकेज देणे अपेक्षित असते. अनेक छोटी राज्ये मदत देत असताना महाराष्ट्रात मात्र अर्थसंकल्पीय आकड्यांची पॅकेजमध्ये बनवाबनवी करण्यात आली आहे. आपली प्रतिमा सुधारण्यासाठी समाजमाध्यमांचे टेंडर जारी केले जातात, पण गरिबांना मदत मिळत नाही. असे असताना सुद्धा आम्ही रचनात्मक विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहोत. संकटात सूचना करणे हे विरोधी पक्षाचे कामच असते. पण, नकारात्मक वातावरणाची निर्मिती होणार नाही, याचीही काळजी घेतली जाणे आवश्यक असते. केंद्र सरकारवर टीका करताना काँग्रेसची किंवा काँग्रेसच्या पाठिंब्याने चालणाऱ्या सरकारांना सुद्धा सल्ला देणे हे काम सुद्धा तुम्ही केले पाहिजे, असे फडणवीस यांनी या पत्रात नमूद केले आहे. आज संपूर्ण जग मोदींच्या प्रयत्नांकडे विश्वासाने पाहते आहे. त्यामुळे जगातील अनेक देश मदत देण्यासाठी पुढे आले आहेत. भारतीय व्हॅक्सिनला नाकारणारा काँग्रेस पक्ष आज त्यावरच राजकारण करताना दिसून येतो. खरे तर व्हॅक्सिनचे उत्पादन वाढते आहे. ऑगस्ट ते डिसेंबर या काळात २०० कोटी व्हॅक्सिन उपलब्ध होणार आहेत. अर्थात भारतीय व्हॅक्सिनबाबतीत काँग्रेसचा विश्वास वाढतोय, ही अतिशय आनंदाची बाब आहे. या संकटात केवळ राजकारण न करता काँग्रेस पक्ष एका रचनात्मक विरोधी पक्षाची भूमिका वठवेल, अशी अपेक्षा आहे, असे नमूद करताना ‘ये पब्लिक है, सब जानती है’, याचे स्मरणही देवेंद्र फडणवीस यांनी करून दिले. वाचा:

Post a Comment

0 Comments