function downloadVideo() { const videoUrl = document.getElementById('videoUrl').value; // Implement logic to download the video (e.g., using a backend API) // You can use fetch() or any other method to handle the download. // Replace this placeholder with your actual download logic. console.log(`Downloading video from ${videoUrl}`); } ऑक्सिजनसंदर्भात ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, राजेश टोपेंनी केली घोषणा

ऑक्सिजनसंदर्भात ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, राजेश टोपेंनी केली घोषणा

मुंबई : राज्यात करोनामुळे (Corona) अवस्था बिकट आहे. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे पण त्यासाठी आरोग्य व्यवस्था (Health system) मात्र अपुरी पडत आहे. राज्यात सध्या करोनाची काय स्थिती आहे, यासंबंधी महत्त्वाची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister ) यांनी दिली. आज आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात फक्त ३५ हजार कोवॅक्सिन (Covacin) उपलब्ध आहेत. अशात १ कोटीहून जास्त नागरिकांचं आतापर्यंत लसीकरण करण्यात आलं आहे. अजूनही मोठ्या प्रमाणात लसीकरण शिल्लक असताना लसी उपलब्ध नसल्याने मोठा गोंधल उडाला आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लसींच्या पुरवठ्याअभावी १८-४४ वयोगटातील नागरिकांचं लसीकरण लांबणीवर पडलं असल्याची माहितीही यावेळी राजेश टोपे यांनी दिली. ऑक्सिजनसंदर्भात महत्त्वाचा निर्णय करोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. ऑक्सिजन अभावी अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. पण यासाठी आता राज्य सरकार तब्बल ३८ रुग्णालयात हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणार असल्याची महत्त्वाची माहिती राजेश टोपे यांच्याकडून देण्यात आली आहे. राज्यातील सक्रिय रुग्णसंख्या कमी या जीवघेण्या संसर्गाची साखळी रोखण्यासाठी राज्यभरात अनेक जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन करण्यात आलं आहे. यामुळे कुठेतरी करोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याचं चित्र आहे. राज्यात अॅक्टिव्ह रुग्ण कमी होत असल्याचं राजेश टोपे म्हणाले. तर यावेळी त्यांनी एक गंभीर बाबही सांगितली. राज्यात म्युकर मायकोसिस या आजाराचे रुग्ण वाढत असून त्यावर तातडीने उपचार केले गेले पाहिजे असं राजेश टोपे म्हणाले. ते पुढे म्हणाले की, महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत म्युकर मायकोसिसचा उपचार मोफत करण्यात येणार आहे. तर या आजारावरील औषधही महाग असल्याने त्याचा पुरवठा सरकार करेल. तर दुसरीकडे लसींसाठीही सरकार मोठ्या शर्तीचे प्रयत्न करत आहे. अनेकांना ऑफर देण्यात आली आहे. पण अद्याप काही उत्तर आलं नसल्याचं राजेश टोपे म्हणाले.

Post a Comment

0 Comments