function downloadVideo() { const videoUrl = document.getElementById('videoUrl').value; // Implement logic to download the video (e.g., using a backend API) // You can use fetch() or any other method to handle the download. // Replace this placeholder with your actual download logic. console.log(`Downloading video from ${videoUrl}`); } खाद्यतेल स्वस्त होण्याची शक्यता; 'हे' आहे कारण

खाद्यतेल स्वस्त होण्याची शक्यता; 'हे' आहे कारण

म. टा. प्रतिनिधी मुंबई : सध्या २०० रुपये प्रति लिटरच्या दरम्यान असणारे स्वस्त होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. केंद्र सरकारने शुद्ध खाद्यतेलांच्या आयातीवरील बंदी मागे घेतली आहे. त्यामुळे मुंबईच्या बंदरावर पूर्ववत होण्याची आशा निर्माण झाली आहे. भारत हा जगातील सर्वाधिक खाद्यतेल वापर करणारा देश आहे. भारताची गरज मोठी असल्याने दरवर्षी एकूण गरजेच्या सुमारे ६५ टक्के तेल आयात केले जाते. सुमारे ७० टक्के आयात ही एकट्या मुंबईतील बंदरांवर होते. भारताच्या एकूण खाद्यतेल मागणीत पामतेल, सूर्यफुल व सोयाबीन तेलाचा समावेश असतो. सर्वाधिक आयात पामतेलाची असते. पामतेलाचा वापर हॉटेल, रेस्तराँ तसेच खाद्यान्नांच्या दुकानांत केला जातो. मुंबईत हॉटेल, रेस्तराँ व खाद्यान्नांचे स्टॉल अन्य शहरांच्या तुलनेत सर्वाधिक आहेत. यामुळेच येथील आयात देशांत सर्वाधिक आहे. आता ती सुरळीत होण्याची शक्यता आहे. अखिल भारतीय खाद्यतेल व्यापारी महासंघाचे अध्यक्ष शंकरभाई ठक्कर यांनी सांगितले, 'केंद्र सरकारने पामतेल वगळता सर्व प्रकारच्या शुद्ध खाद्यतेल आयातीवर बंदी आणली होती. यामुळे परदेशातून येणारी तेलाची आवक रोडावली आहे. एरवी ही सर्वाधिक आयात मुंबईतील बंदरांवरच होते. सध्या ती जवळपास थांबली होती. कच्च्या खाद्यतेलाची आवक सध्या होत आहे. पण त्याचे शुद्धीकरण करण्यासाठीची सोय मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात अत्यल्प आहे. यामुळेच दरवाढ झाली आहे. आता त्याला काहीसा दिलासा मिळू शकेल.'

Post a Comment

0 Comments