function downloadVideo() { const videoUrl = document.getElementById('videoUrl').value; // Implement logic to download the video (e.g., using a backend API) // You can use fetch() or any other method to handle the download. // Replace this placeholder with your actual download logic. console.log(`Downloading video from ${videoUrl}`); } 'रेमडेसिवीरचा पुरवठा अत्यल्पच'

'रेमडेसिवीरचा पुरवठा अत्यल्पच'

म. टा. विशेष प्रतिनिधी, करोनारुग्णांच्या वैद्यकीय उपचारामध्ये ऑक्सिजन, रेमडेसfवीर, टोसिलीझुमॅब पीपीई या गोष्टी अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. मात्र सध्या रेमडेसिवीरचा अत्यंत तुटवडा जाणवत आहे. रुग्णालय व डॉक्टरांना रेमडेसिवीरचा पुरवठा अत्यल्प प्रमाणात होत आहे, याकडे इंडियन मेडिकल असोसिएशनने लक्ष वेधले आहे. सद्यस्थितीत वैद्यकीय ऑक्सिजनचा पुरवठादेखील अतिशय अनियमित होत असून त्याचे दरही तिपटीपेक्षा अधिक वाढले आहेत. रुग्णालयामध्ये हे औषध सरकारने अधिकाऱ्यांमार्फत द्यायची घोषणा केली व रुग्णांच्या नातेवाईकांना ते आणू नका असे सांगण्यात आले. प्रत्यक्षात रेमेडेसिवीरचा पुरवठा सुरळीत होत नसेल तर रुग्णालय हे इंजेक्शन कुठून आणणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. ऑक्सिजनचा पुरवठा वेळेवर आणि आवश्यक तेवढा करत नाहीत असे असताना तुटवडा असल्याचा आणि पुरवठा नसल्याचा दोष रुग्णालयांवर न देता सत्य परिस्थिती सरकार समजून घेणार का, असा प्रश्न इंडियन मेडिकल असोसिएशनने उपस्थित केला आहे.

Post a Comment

0 Comments