function downloadVideo() { const videoUrl = document.getElementById('videoUrl').value; // Implement logic to download the video (e.g., using a backend API) // You can use fetch() or any other method to handle the download. // Replace this placeholder with your actual download logic. console.log(`Downloading video from ${videoUrl}`); } चंद्रकांत पाटील यांना मानसिक उपचारांची गरज: अशोक चव्हाण

चंद्रकांत पाटील यांना मानसिक उपचारांची गरज: अशोक चव्हाण

चंद्रकांत पाटील यांना मानसिक उपचारांची गरज: अशोक चव्हाण

मुंबई: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी सरकारवर टीकेची झोड उठविणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांच्यावर काँग्रेसचे नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री यांनी प्रत्युत्तर देत टोले लगावले आहेत. सत्ता गेल्याचे नैराश्य, पुन्हा सत्ता मिळत नसल्याची हतबलता आणि मराठा आरक्षणाच्या 'फुलप्रुफ'तेचा सर्वोच्च न्यायालयात भंडाफोड झाल्याने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाला आहे, असा टोला चव्हाण यांनी लगावला आहे. 


पाटील हे सतत बेताल विधाने करीत असून, त्यांनी चांगले मानसिक उपचार घेण्याची नितांत गरज असल्याचे चव्हाण यांनी म्हटले आहे. (bjp leader needs mental treatment says congress leader ) भाजपला सत्ता गेल्याचे नैराश्य होतेच. सतत तारखा देऊन महाविकास आघाडी सरकार अस्थिर होत नसल्याने हतबलताही आलेली होती.

 वरून मराठा आरक्षणाबाबत भाजपने केलेल्या खोट्या दाव्यांचा सर्वोच्च न्यायालयानेच भंडाफोड केल्याने चंद्रकांत पाटील सैरभैर झाले आहेत. या प्रचंड ताणतणावामुळे नेमके काय बोलावे हे कळेनासे झाल्याने शब्द निवडताना सतत त्यांचा तोल सुटतो आहे. पण योग्य मानसिक उपचारातून या समस्येवर नक्कीच मार्ग निघू शकेल, अशी मला अपेक्षा असल्याचे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

तातडीने फेर याचिका दाखल करण्याचीही केली मागणी सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीवर टीकेची झोड उठवली. मराठा आरक्षण प्रश्नी केंद्राप्रमाणे राज्य सरकारनेही तातडीने सर्वोच्च न्यायालयात फेर याचिका दाखल करावी, अशी मागणीही चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. 

आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत जे जे ओबीसी समाजाला ते ते सर्व मराठा समाजाला सुविधा देण्यासाठी तीन हजार कोटींचे पॅकेज जाहीर करावे अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. ही घोषणा करण्याचे धाडस मंत्रिमंडळातील कुठल्याच नेत्याकडे नसल्याची टीकाही त्यांनी केली. 

अजित पवार डायनॅमिक आहेत, त्यांनी ठरवलं तर ते घोषणा करू शकतात, असे सांगतानाच अजित पवार ते का करत नाहीत असा सवालही आमदार पाटील यांनी उपस्थित केला आहे.

Post a Comment

0 Comments