function downloadVideo() { const videoUrl = document.getElementById('videoUrl').value; // Implement logic to download the video (e.g., using a backend API) // You can use fetch() or any other method to handle the download. // Replace this placeholder with your actual download logic. console.log(`Downloading video from ${videoUrl}`); } Nana Patole: 'संजय राऊतांच्या बोलण्याकडे आम्ही लक्ष देत नाही आणि...'; पटोले भडकले

Nana Patole: 'संजय राऊतांच्या बोलण्याकडे आम्ही लक्ष देत नाही आणि...'; पटोले भडकले

मुंबई: निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव झाला आहे. काँग्रेसला तिथे एकही जागा जिंकता आलेली नाही. त्याअनुषंगाने काँग्रेसच्या अपयशावर बोट ठेवत राष्ट्रीय पातळीवर भक्कम अशी नवीन आघाडी उभारायला हवी असे मत मांडणारे शिवसेना नेते, खासदार यांच्यावर प्रदेशाध्यक्ष यांनी थेट शब्दांत निशाणा साधला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत वरवर सर्व काही आलबेल असल्याचं दाखवलं जात असलं तरी आतून बरीच धुसफूस चालली असल्याचे उघड झाले आहे. ( ) वाचा: पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी जी मुसंडी मारली आहे ती जमेची बाजू आहे. मात्र त्याचवेळी काँग्रेसला तिथे आलेले अपयश ही नक्कीच चिंतेची बाब आहे. काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे. विरोधी पक्षांच्या आघाडीचं नेतृत्व काँग्रस करत आहे. अशावेळी काँग्रेसचं यश महत्त्वाचं ठरतं, असे नमूद करत राष्ट्रीय पातळीवर भविष्यात महाराष्ट्राप्रमाणे भक्कम आघाडी उभारली गेली पाहिजे, यासाठी आपली यांच्याशी चर्चा झाल्याचे संजय राऊत यांनी म्हटले होते. त्यावर बोलताना नाना पटोले यांनी राऊत यांचा समाचार घेतला. वाचा: 'संजय राऊत काय बोलतात याकडे आम्ही लक्ष देत नाही आणि त्यांचा सामना पेपर देखील आम्ही वाचत नाही', असं विधान करत पटोले यांनी राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडले. दुसऱ्यावर टीका करून, दुसऱ्यांना सल्ले देऊन आपला पक्ष मोठा होतो, असे जर कुणाला वाटत असेल तर तो त्यांचा भ्रम आहे. दुसऱ्याकडे बोट दाखवताना चार बोटे आपल्याकडे असतात हे त्यांनी ध्यानात ठेवावे, असेही पटोले यांनी सुनावले. युपीएची दारे सर्वांसाठी खुली आहेत केंद्रीय पातळीवर भक्कम आघाडी उभी राहणार असेल तर त्याचा आत्मा निश्चितपणे काँग्रेस पक्ष असेल, या राऊत यांच्या म्हणण्याचे मात्र पटोले यांनी स्वागत केले. काँग्रेस पक्षच युपीएचा आत्मा आहे याची जाणीव संजय राऊत यांना झाली त्यासाठी मी त्यांना धन्यवाद देतो, असे पटोले म्हणाले. देशाची प्रतिमा जपली पाहिजे आणि लोकांच्या जीविताचे रक्षण केले पाहिजे ही काँग्रेस पक्षाची भूमिका राहिली आहे आणि भविष्यातही राहणार आहे, असे नमूद करतानाच युपीएची दारे सर्वांसाठी खुली आहेत. जे येतील त्यांचे स्वागतच केले जाईल, असेही पटोले म्हणाले. वाचा:

Post a Comment

0 Comments