function downloadVideo() { const videoUrl = document.getElementById('videoUrl').value; // Implement logic to download the video (e.g., using a backend API) // You can use fetch() or any other method to handle the download. // Replace this placeholder with your actual download logic. console.log(`Downloading video from ${videoUrl}`); } Maharashtra Covid Vaccination: कोविड लसीकरणात महाराष्ट्र सर्वात पुढे; दोन कोटींचा टप्पा ओलांडला

Maharashtra Covid Vaccination: कोविड लसीकरणात महाराष्ट्र सर्वात पुढे; दोन कोटींचा टप्पा ओलांडला

मुंबई: प्रतिबंधात्मक लसीकरणात आज महाराष्ट्राने २ कोटीचा टप्पा ओलांडला आहे. एवढ्या मोठ्या संख्येने नागरिकांचे करणारे हे देशातील एकमेव राज्य ठरले आहे. या कामगिरीबद्दल मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य यंत्रणेचे अभिनंदन केले आहे. ( ) वाचा: राज्यात सोमवारी १२३९ लसीकरण केंद्रांच्या माध्यमातून सुमारे ९९ हजार ६९९ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. त्यासोबतच दोन कोटींचा टप्पा ओलांडला गेला आहे. महाराष्ट्राने आतापर्यंत एकूण २ कोटी ९० हजार लाभार्थ्यांचे लसीकरण केल्याची माहिती आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव यांनी दिली आहे. राज्यात आतापर्यंत १८ ते ४४ वयोगटातील ६ लाख ५५ हजार नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. महाराष्ट्र सुरुवातीपासूनच करोना प्रतिबंधक लसीकरणात देशात अग्रेसर असून महाराष्ट्रापाठोपाठ राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश या राज्यांचा क्रमांक लागतो. वाचा: महाराष्ट्राने लसीकरणाचा दोन कोटींचा टप्पा ओलांडल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्वीटरच्या माध्यमातून आरोग्य यंत्रणेचे अभिनंदन केले. लसीकरणाचा हा विक्रमी टप्पा गाठणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य ठरले असून या कामगिरीबद्दल मी आरोग्य यंत्रणेचे अभिनंदन करत आहे, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. तर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही यंत्रणांचे कौतुक केले. 'करोनापासून करायची असेल आपली सुरक्षा, लस घेण्यात आथा नको कोणतीही शंका', असे सांगत आपली वेळ आल्यावर लस नक्की घ्या, अशे आवाहन राजेश टोपे यांनी केले. वाचा:

Post a Comment

0 Comments