मुंबई: चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण किनारपट्टीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोकण किनारपट्टीपासून हे वादळ बरेच दूर असून आज रात्री किंवा उद्या या वादळाचा प्रभाव किनारपट्टी भागात जाणवू शकतो, असे सांगण्यात येत आहे. राज्यातील किनारपट्टी भागातील जिल्ह्यांत जोरदार वारे वाहण्याची तसेच मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. ( ) जाणून घ्या तौत्के चक्रीवादळाचे क्षणाक्षणाचे अपडेट्स... - बीकेसी कोविड सेंटर येथे २० रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. पालिकेकडून आदेश आल्यास रुग्ण हलवणार. डाॅ. राजेश डेरे यांनी दिली माहिती. - सिंधुदुर्ग जिल्ह्यात समुद्र खवळला. किनारपट्टीवार उंच लाटांच्या धडका. - सिंधुदुर्ग, जिल्ह्याच्या किनारपट्टीवर पावसाळी वातावरण. येत्या दोन तासांत जिल्ह्यात ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहून मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. - चक्रीवादळाचा प्रवास वेगाने उत्तरेच्या दिशेने सुरू. महाराष्ट्रात धडकण्याची शक्यता कमी. मात्र समुद्र खवळलेला राहणार.
0 Comments