function downloadVideo() { const videoUrl = document.getElementById('videoUrl').value; // Implement logic to download the video (e.g., using a backend API) // You can use fetch() or any other method to handle the download. // Replace this placeholder with your actual download logic. console.log(`Downloading video from ${videoUrl}`); } 'नरेंद्र मोदी दिलदार आहेत, गुजरातला १००० कोटी दिले महाराष्ट्राला १५०० कोटी देतील'

'नरेंद्र मोदी दिलदार आहेत, गुजरातला १००० कोटी दिले महाराष्ट्राला १५०० कोटी देतील'

मुंबई : तौक्ते चक्रीवादळामुळे (tauktae cyclone) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister )यांनी गुजरातला (Gujarat)नुकसान भरपाईसाठी तब्बल १००० कोटी रुपये मंजूर केले आहे. यावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत ()यांनी मोदींना चिमटे काढले आहेत. नरेंद्र मोदी हे दिलदार आहेत. त्यांनी गुजरातला १००० कोटी दिले ते महाराष्ट्रासाठी नक्कीच १५०० कोटी मदत देणार असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ()हे राज्य सरकारकडे चक्रीवादळामुळे नुकसानग्रस्तांना मदत देण्याची मागणी करत असतानाच संजय राऊत यांनी केंद्राला आणि नरेंद्र मोदी यांनी दिलदार असल्याचं म्हटलं आहे. मोदींचं सगळ्या देशाकडे लक्ष असतं. त्यामुळे ते महाराष्ट्राला नक्की मदत करतील असं राऊतांनी म्हटलं आहे. यावर ते पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चक्रीवादळाच्या धोक्यानंतर तात्काळ गुजरातला मदत केली. याचं आम्हाला दु:ख नाहीये. पण त्यांचं विमान कधीतरी महाराष्ट्राकडेही वळेल, अशी आशा असल्याचं संजय राऊत म्हणाले. इतकंच नाहीतर केंद्र सरकारने महाराष्ट्र आणि गोव्याला 1500 आणि 500 कोटींची मदत द्यावी, अशी मागणीही यावेळी त्यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस हे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्गमध्ये त्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत आहेत. यावेळी त्यांनी राज्य सरकारकडून तातडीने मदतीची मागणी केली आहे. त्यामुळे आता संजय राऊतांच्या या मागणीवर विरोधी पक्ष काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

Post a Comment

0 Comments