function downloadVideo() { const videoUrl = document.getElementById('videoUrl').value; // Implement logic to download the video (e.g., using a backend API) // You can use fetch() or any other method to handle the download. // Replace this placeholder with your actual download logic. console.log(`Downloading video from ${videoUrl}`); } अमृता फडणवीसांच्या नव्या ट्वीटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ, राजकारण पेटणार?

अमृता फडणवीसांच्या नव्या ट्वीटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ, राजकारण पेटणार?

मुंबई : राज्यात तौक्ते चक्रीवादळामुळे भीषण परिस्थिती ओढावली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून सोसाट्याचा वारा वाहत आहे. यावरून अमृता फडणवीस यांनी एक ट्वीट केलं आहे. त्यांच्या या ट्वीटमुळे राजकारणात चर्चेला उधाण आलं असून सोशल मीडियावरही याची जोरदार चर्चा सुरू आहे. 'तूफ़ां तो इस शहर में अक्सर आता है ,देखें अबके किसका नंबर आता है !' अशा शब्दात अमृता फडणवीस यांनी ट्वीट केलं आहे. या ट्वीटमुळे नव्या राजकारणाला सुरुवात होणार का? यातून अमृता फडणवीस यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे का? अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत. दरम्यान, याआधीही त्यांनी सत्ताधारी पक्षावर टीका करणारे अनेक ट्वीट्स केले आहे. त्यामुळे त्यांच्या या टीकेला आता कोण आणि कसं प्रत्यूत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. खरंतर, शिवसेना आणि भाजपचा काडीमोड झाल्यानंतर शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत युती केली. यानंतर अमृता फडणवीस आणि मविआ सरकार असा वाद नेहमीच रंगत आला. याआधीही अमृता फडणवीसांनी अनेक मुद्द्यांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सरकारवर टीका केली आहे. त्यामुळे राजकारणात आता नव्या वादाला सुरुवात होणार का असा प्रश्न आहे.

Post a Comment

0 Comments