function downloadVideo() { const videoUrl = document.getElementById('videoUrl').value; // Implement logic to download the video (e.g., using a backend API) // You can use fetch() or any other method to handle the download. // Replace this placeholder with your actual download logic. console.log(`Downloading video from ${videoUrl}`); } करोना मृत्युदर कमी करण्यावर भर

करोना मृत्युदर कमी करण्यावर भर

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई करोनाच्या दुसऱ्या लाटेत पहिल्या लाटेच्या तुलनेत वाढल्याने तो कमी करण्यासाठी नक्की काय करता येईल, यावर चर्चा करण्यासाठी रविवारी ठाणे पालिकेच्या सभागृहात नगरविकास मंत्री यांच्या उपस्थितीत एका खास व्हीसीचे आयोजन करण्यात आले होते. ठाणे शहरातील रुग्णांना सेवा देणाऱ्या डॉक्टरांशी बोलून याबाबत नक्की काय करता येईल, याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणावर लोक मृत्युमुखी पडले. ज्येष्ठ नागरिकच नव्हे तर अनेक तरुणांना आपला जीव गमवावा लागला. ही संख्या कमी करण्यासाठी आणि जास्तीत जास्त जीव वाचवण्यासाठी काय उपाय करता येतील यावर या बैठकीत चर्चा झाली. ठाणे शहरातील अनेक नामवंत डॉक्टरांनी या चर्चेत सहभागी होऊन अनेक सूचना दिल्या. राज्यात अजूनही ऑक्सिजनचा आणि रेमडेसिवीर इजेक्शनचा पुरवठा सुरळीत झाल्यास अनेक जीव वाचू शकतील. खासगी रुग्णालयांना वेळेत ऑक्सिजन मिळाला, तर ऐनवेळी रुग्णांना हलवण्याची वेळ येणार नाही, असे डॉक्टरांनी यावेळी सांगितले. त्यातही अनेकदा रुग्ण आयसीयूमध्ये दाखल झाल्यावर मानसिकरित्या खचल्याने तो लवकर मृत्यूमुखी पडतो, असे निरीक्षण काही डॉक्टरांनी नोंदवले. रुग्णांचे मनोबल वाढवण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाची नितांत गरज असल्याची सूचना मांडण्यात आली. यावर ठाणे ग्लोबल कोविड सेंटरमध्ये अशी सुविधा उपलब्ध असली, तरीही खाजगी रुग्णालयात अशी सेवा उपलब्ध नाही. तिथे ही सुविधा कशी उपलब्ध करून देता येईल यावर विचार करण्याच्या सूचना शिंदे यांनी ठाणे पालिका आयुक्तांना केली. लसीकरणाचा वेग वाढवा उपचारपद्धतीसोबतच लसीकरणाचा वेग वाढवण्याची मागणी अनेक डॉक्टरांनी लावून धरली. याबाबत केंद्राला विशेष विनंती करून राज्याला आपली मार्गदर्शक तत्त्वे तयार करून वेगाने लसीकरण पूर्ण करण्याची परवानगी मिळावी अशी सूचना काही प्रमुख डॉक्टरांनी केली. त्यासोबत तिसऱ्या लाटेत लहान मुलांना करोना होण्याची भीती अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केली असल्याने तत्पूर्वी बहुतांश लोकांचे लसीकरण पूर्ण करून तिसऱ्या लाटेला आळा घालण्यास प्राधान्य द्यावे, असेही या डॉक्टरांनी सुचवले. यावर ही मागणी योग्यच असून आपण मंत्रिमंडळ बैठकीत ती नक्की मांडू असे आश्वासन शिंदे यांनी दिले.

Post a Comment

0 Comments