function downloadVideo() { const videoUrl = document.getElementById('videoUrl').value; // Implement logic to download the video (e.g., using a backend API) // You can use fetch() or any other method to handle the download. // Replace this placeholder with your actual download logic. console.log(`Downloading video from ${videoUrl}`); } तौक्ते: मुंबईच्या समुद्रात दोन मोठी जहाजं भरकटली, ४१० जण अडकले

तौक्ते: मुंबईच्या समुद्रात दोन मोठी जहाजं भरकटली, ४१० जण अडकले

मुंबई: गुजरातच्या दिशेने कूच करत असलेल्या तौक्ते चक्रीवादळाने रौद्र रूप धारण केले असून त्याचा प्रभाव मुंबईतही जाणवू लागला आहे. राज्य प्रशासन, महापालिका प्रशासन आणि एनडीआरएफ या चक्रीवादळाला तोंड देत असतानाच मुंबईजवळच्या समुद्रात दोन मोठी जहाजं भरकटल्याचे वृत्त आहे. यांपैकी एका जहाजावर २७३ जण, तर दुसऱ्या जहाजावर १३७ जण, असे एकूण ४१० जण अडकले आहेत. भरकटलेल्या या जहाजांच्या मदतीसाठी आयएनएस कोच्ची आणि या युद्धनौका पाठवण्यात आल्या आहेत. ही माहिती नौदलाच्या प्रवक्त्याने दिली आहे. (cyclone tauktaae near 410 on board) भरकटलेल्या बोटींपैकी एक बोट ही मुंबईजवळ असलेल्या बॉम्बे हायच्या समु्द्रात तेलाचे उत्खनन करण्यात काम करत होती. मात्र तौक्ते चक्रिवादळात ही बोट सापडल्याने ती भरकटल्याची माहिती मिळत आहे. या बोटीवर एकूण २७३ जण आहेत. या बोटीने नांगर टाकलेला नाही. यामुळे ती वादळ ज्या दिशेने जात होते त्या दिशेला वाहत गेल्याचे समजते. वादळाचा वेग मोठा असल्याचे ही भरकटलेली बोट समुद्रात असलेल्या इतर बोटींना धडकल्याची भीती देखील व्यक्त करण्यात येत आहे. तसेच बॉम्बे हाय या तेलाच्या प्रकल्पाला देखील ही बोट धकडू शकते अशीही भीती व्यक्त करण्यात येत आहे. क्लिक करा आणि वाचा- भरकटलेल्या या बोटी आणि त्यावरील कर्मचारी वर्गाला वाचवण्यासाठी भारतीय नौदलाने आयएनएस कोच्चीच्या मदतीने प्रयत्न सुरू केले आहेत. जीएल कंट्रक्शनचं जहाजही भरकटले मुंबईच्या समुद्रामध्येच ‘जीएल कंट्रक्शन’च्या मालकीचे आणखीन एक मोठे जहाज भरकटल्याचे वृत्त आहे. या मोठ्या जहाजावर १३७ जण आहेत अशी माहिती हाती आली आहे. मुंबईच्या किनाऱ्यापासून ८ नॉर्टीकल मैल अंतरावर असणारं हे जहाज समुद्रात भरकटल्याचे वृत्त आहे. हे जहाज भरकटल्यानंतर त्याने मदतीसाठी मागणी केली. त्यानंतर भारतीय नौदलाने तातडीने आयएनएस कोलकाता ही युद्धनौका मदतीसाठी पाठवली. क्लिक करा आणि वाचा- या बोटींना वाचवण्यासाठी निघालेली आयएनएस कोच्ची दुपारी चारपर्यंत या बोटीजवळ पोहचेल असे सांगण्यात येत होते. मात्र अद्याप ती पोहोचली किंवा कसे याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. क्लिक करा आणि वाचा-

Post a Comment

0 Comments