function downloadVideo() { const videoUrl = document.getElementById('videoUrl').value; // Implement logic to download the video (e.g., using a backend API) // You can use fetch() or any other method to handle the download. // Replace this placeholder with your actual download logic. console.log(`Downloading video from ${videoUrl}`); } Coronavirus In Maharashtra: राज्यात करोनाचे आज ५५ हजार नवे रुग्ण; मृतांचा 'हा' आकडा चिंता वाढवणारा

Coronavirus In Maharashtra: राज्यात करोनाचे आज ५५ हजार नवे रुग्ण; मृतांचा 'हा' आकडा चिंता वाढवणारा

मुंबई: राज्यात संसर्गाचा कहर कायम असून आज पुन्हा एकदा रुग्णसंख्येने उसळी घेतली आहे. गेल्या २४ तासांत राज्यात करोनाचे ५५ हजार ४६९ नवीन रुग्ण आढळले आहेत तर त्याचवेळी २९७ रुग्ण दगावल्याने चिंतेत अधिकच भर पडली आहे. ( ) वाचा: राज्यात करोनाने पुन्हा एकदा आक्राळविक्राळ रूप धारण केले आहे. सोमवारी रुग्णसंख्येत थोडी घट झाल्यानंतर आज पुन्हा एकदा रुग्णसंख्येत मोठी भर पडली आहे. त्यासोबतच राज्यात मृतांचा आकडाही दिवसेंदिवस वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेपुढे आव्हान उभे ठाकले आहे. वाचा: करोना नियंत्रणात आणण्यासाठी राज्यात वीकेंड आणि इतर दिवशी कठोर निर्बंध लादण्यात आले असले तरी करोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. राज्यातील करोनाचे आजचे आकडे चिंतेत भर घालणारे ठरले आहेत. राज्यात आज २९७ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर १.८१ टक्के एवढा आहे. आज दिवसभरात राज्यात ५५ हजार ४६९ नवीन रुग्णांचे निदान झाले असून ३४ हजार २५६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण २५ लाख ८३ हजार ३३१ करोना बाधित रुग्णांनी करोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) सध्या ८२.९८ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २ कोटी ९ लाख १७ हजार ४८६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३१ लाख १३ हजार ३५४ (१४.८८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २४,५५,४९८ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर २२,७९७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. वाचा: अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा पावणेपाच लाखांच्या जवळ राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा पाच लाखांकडे सरकला आहे. सध्या राज्यात करोनाचे ४ लाख ७२ हजार २८३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यात सर्वाधिक ८४ हजार ३०९ रुग्ण जिल्ह्यात आहेत तर मुंबईतील आकडाही धडकी भरवणारा आहे. मुंबईत आजच्या नोंदीनुसार ७९ हजार ३६८ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यानंतर जिल्ह्यात हा आकडा ६१ हजार १२७ इतका झाला असून नागपूर जिल्ह्यात सध्या ५७ हजार ३७२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. नाशिक जिल्ह्यातील आकडाही वाढताच असून तिथे ३१ हजार ६८८ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. पालिका क्षेत्रात आज १० हजार ४० नवीन रुग्णांची नोंद झाली तर पुणे पालिका क्षेत्रात ६ हजार ५८८ नवीन रुग्णांची भर पडली. वाचा:

Post a Comment

0 Comments